पर्यावरणीय व्यवस्थापन

पर्यावरण संवर्धन: आपली सामाजिक जबाबदारी

views

3:38
पर्यावरणाशी मानवाचा तो अस्तित्वात आल्यापासूनच अगदी जवळचा संबंध आहे. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर बरीच प्रगती केली आहे. आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यही पार पाडले आहे. मात्र हे सर्व करत असताना त्याने नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर केला आहे. या प्रगतीमुळे पर्यावरणाची खूप हानी झाली आहे. त्यामुळे पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास मानवाने केला. आता त्याचे संवर्धन करणे ही सुद्धा काळाची गरज बनली आहे. पर्यावरण समतोल राखणे हे मानवाचे आद्द्य कर्तव्य आहे. त्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम करणारी कृती आपण टाळली पाहिजे. आपली जबाबदारी म्हणून आपण पर्यावरणाचे संवर्धन केले पाहीजे. बरं तुम्हाला माहित आहेत का फुलपाखरे पर्यावरण संतुलनामध्ये काय काम करतात?