पर्यावरणीय व्यवस्थापन

पर्यावरण व परिसंस्था संबंध

views

3:07
आपल्या सभोवताली असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती होय. पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सजीव - निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा समावेश असतो. पर्यावरणाचे दोन मुख्य प्रकार पडतात. पहिला नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा मानवनिर्मित पर्यावरण होय. मुलांनो, नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव यांचा समावेश होतो. यातील जैविक व अजैविक घटक यांमध्ये नेहमी आंतरक्रिया घडत असतात. त्यांचे परस्पर संबंध फार महत्त्वपूर्ण असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचाही नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतच असतो. पर्यावरणामध्ये जैविक व अजैविक घटकांचा समावेश होतो. पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांतील आंतरसंबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पारिस्थितिकी असे म्हणतात. पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी ज्या कार्यात्मक एककाचा वापर केला जातो त्यास ‘परिसंस्था’ असे म्हणतात.