पर्यावरणीय व्यवस्थापन

पर्यावरण संवर्धन

views

2:18
आता आपण पर्यावरण संवर्धनाविषयी माहिती जाणून घेऊ. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. आज औद्योगिकीकरणामुळे अनेक घटकांचा पर्यावरणावर परिणाम होत असतो. मला सांगा की पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात? पर्यावरणावर नैसर्गिक व मानवनिर्मित घटक परिणाम करत असतात. या नैसर्गिक घटकांमध्ये होणारे बदल, तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम घडून येतो. त्यामुळे अन्नसाखळी व अन्नजाळी यांच्यामध्ये होणाऱ्या आंतरक्रियेवर परिणाम होतो. मानवनिर्मित कारणांमुळे तर पर्यावरणाची खुप हानी होते. बरं मग पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल? भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर आधी भक्ष्यांचे प्रमाण कमी होत जाईल. नंतरच्या काळात भक्षकांची संख्या अन्न न मिळाल्यामुळे कमी होत जाईल. नदीच्या किनाऱ्यावर जर उद्योगधंदे उभारले तर या कारखान्यातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे नदीचे पाणी दूषित होते. तसेच हवेत धुराचे प्रदूषण झाल्यामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांच्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो.