पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म

उष्णता आणि अवस्थांतर

views

5:32
स्थायू पदार्थाला उष्णता दिली की त्याचे द्रव पदार्थात रूपांतर होते. उदा.:- खोबरेल तेल, मेण. म्हणजेच खोबरेल तेल किंवा मेण घट्ट असेल तर आपण त्याला उष्णता दिली की ते वितळते. तसेच द्रव पदार्थाला उष्णता दिली की द्रव पदार्थाचे वायू अवस्थेत अवस्थांतर होतांना आपण पाहिले आहे. उदा. पाणी गरम झाल्यानंतर त्यातून वाफा निघण्यास सुरुवात होते.तसेच जर उष्णता कमी केली किंवा कमी झाली तर वायूचे द्रव पदार्थात व द्रव पदार्थाचे स्थायू पदार्थांमध्ये अवस्थांतर होते हे आपण पाहिले आहे.