पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म

अवस्थांतराचे विविध उपयोग

views

3:37
पदार्थाच्या अवस्थांतराचे आपल्याला कोणते उपयोग होतात याची माहिती आपण आता घेणार आहोत. १. ‘पॅराफिन वॅक्स’(मेण) वितळवून आपण त्यापासून मेणबत्ती बनवू शकतो. २. आईस्क्रीम तयार करताना ते गोठण्यासाठी आपण गोठवलेल्या कार्बनडायऑक्साईडचा वापर करतो. त्यामुळे आईस्क्रीम जास्त काळ थंड राहू शकते. ३. आपण सोने,चांदी, या धातूचे दागिने वापरत असतो. हे दागिने बनविताना सोने, चांदी हे धातू वितळवले जातात. ४. द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी आणि पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो. लोखंडापासून अवजारे बनविण्यासाठी आपल्याला लोखंड हा धातू ठरावीक उष्णता देऊन वितळवावा लागतो.