पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म

कठीणपणा

views

3:27
एखादया पदार्थावर आघात करताना होणारा परिणाम त्याच्या कठीणपणा यावर अवलंबून असतो. उदा. सिमेंट च्या भिंतीमध्ये खिळा घुसवताना थोडा त्रास होतो तोच खिला लाकडामध्ये घुसवताना तो सहज घुसतो. सिमेंटच्या भिंतीपेक्षा मातीच्या चिखलामध्ये खिळा घुसवणे सहज आणि सुलभ होते. तसेच लाकडामध्ये घुसवण्यापेक्षा पुठ्ठयामध्ये खिळा घुसवणे आपल्याला सोपे जाते. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थाला किती विरोध करतो यावरून त्या पदार्थाचा कठीणपणा ठरतो.