त्रिकोण

सोडवलेली उदाहरणे

views

2:51
आता आपण एक सोडवलेले उदाहरण पाहूया. उदा.1) एका त्रिकोणाच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर 5:6:7 आहे. तर त्या सर्व कोनांची मापे काढा. उकल: समजा त्या कोनांच्या मापासाठी स्थिरांक आपण x मानू. म्हणून त्या कोनांची मापे अनुक्रमे 5 x, 6 x, 7 x होतील. मुलांनो आपल्याला माहित आहे की, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180० असते. ∴ 5 x + 6 x + 7 x = 180० ( 5 x, 6 x व 7 x ची बेरीज करू). 18 x = 180० (x ची किंमत काढण्यासाठी 180० ला 18 ने भाग द्यावा लागेल). x = 180/18 x = 10 आता x ची किंमत मिळाली असता आपण दिलेल्या कोनांची मापे काढूया. 5 x = 5 x 10 = 50०, 6 x = 6 x 10 = 60०, 7 x = 7 x 10 = 70० यावरून असे लक्षात येते की त्रिकोणाच्या कोनांची मापे 50०, 60०, 70० आहेत.