त्रिकोण

प्रमेय

views

3:38
त्रिकोणाचे दोन कोन असमान मापाचे असतील तर मोठया कोनासमोरील बाजू ही लहान कोनासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. शक्यता: म्हणून बाजू AC ही बाजू AB पेक्षा मोठी आहे (AC > AB) हे सत्य आहे. मागील इयत्तेत जो त्रिकोणाचा एक गुणधर्म पाहिला होता तो आठवूया. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे याठिकाणी दुकान आहे. समीर C या ठिकाणी उभा होता. दुकानात पोहचण्यासाठी त्याने C→ B →A या डांबरीमार्गाएवजी C→A हा मार्ग घेतला. कारण त्याच्या लक्षात आले की हा मार्ग कमी लांबीचा आहे. म्हणजे त्रिकोणाचा असा गुणधर्म समजतो, कोणत्याही त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते, हा गुणधर्म आता सिद्ध करून पाहूया.