त्रिकोण

त्रिकोणांची समरूपता

views

4:10
आता आपण समरूप त्रिकोणांचे गुणधर्म एका कृतीतून समजून घेऊन. कृती : 4 सेमी, 3 सेमी व 2 सेमी बाजू असलेला एक त्रिकोण कागदावर काढा. हा त्रिकोण एका जाड कागदावर ठेवा. त्या भोवती पेन्सिल फिरवून तसे 14 त्रिकोण कापून तयार करा. कागदाचे हे त्रिकोणाकृती तुकडे एकरूप आहेत हे लक्षात घ्या. ते खाली दाखवल्या प्रमाणे रचून तीन त्रिकोण तयार करा. या पहिल्या आकृतीत त्रिकोणांची संख्या एक आहे. दुसऱ्या आकृतीत त्रिकोणांची संख्या 4 आहे. आणि तिसऱ्या आकृतीत त्रिकोणांची संख्या 9 आहे. या संगतीत त्यांचे कोन एकरूप आणि बाजू प्रमाणात आहेत. कारण या संगत बाजू प्रमाणात आहेत.