त्रिकोण

30० 60० 90० मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म

views

3:24
आज आपण 30० 60० 90० मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म पाहूया. कृती: एका कोनाचे माप 30० आहे असा काटकोन त्रिकोण. आता 30० मापाच्या कोनासमोरील बाजूंची आणि कर्णाची लांबी मोजून खालील सारणीत भरू. वरील सारणीवरून कोनांची मापे 30०, 60०, आणि 90० असणाऱ्या त्रिकोणाच्या बाजूंचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत. 1) जर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30० व 60० असतील तर 30० च्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. 2) जर काटकोन त्रिकोणात इतर कोन 30० व 60० असतील तर 60० च्या कोनासमोरील बाजू ही √3/2 X कर्ण असते.