त्रिकोण

30०-60०-90० चे प्रमेय

views

3:08
आज आपण 30०-60०-90० चे प्रमेय सोडवून पाहूया. 45०,45०,90० असे कोन असणाऱ्या त्रिकोणाला समद्विभूज काटकोन असे म्हणतात. मुलांनो लक्षात घ्या की, त्रिकोणाचे कोन 30०,60०,90० असतील तर 30० च्या कोनासमोरील बाजू कर्ण/2 असते. आणि 60० कोनासमोरील बाजू (√3)/2 कर्ण असते. या प्रमेयाला 30०-60०-90० चे प्रमेय म्हणतात. त्रिकोणाचे कोन 45०,45० व 90० असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू कर्ण/(√2) असते. या प्रमेयाला 45०-45०-90० प्रमेय म्हणतात.