सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-1)

प्रस्तावना

views

4:49
सजीवांविषयी आपण माहिती अभ्यासली आहे. सजीवांना अन्नपाण्याची, सूर्यप्रकाशाची गरज असते. सजीवांना वाढीसाठी उर्जेची गरज असते. ही ऊर्जा निसर्गातील विविध घटकांपासून सजीवांना मिळते. ऊर्जेद्वारे ते आपल्या गरजा पूर्ण करतात आणि आपल्या जीवनप्रक्रिया व्यवस्थित कार्यरत ठेवतात. तर या पाठामध्ये आपण सजीवांमध्ये होणाऱ्या जीवनप्रक्रीयेंविषयी माहिती अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही मला सांगा अन्नपदार्थ व त्यातील पोषकतत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त आहेत? शरीरात अन्नपदार्थाचे पचन होऊन पोषकतत्वे तयार होतात. ही पोषकतत्वे रक्तामार्फत प्रत्येक पेशीपर्यंत पोहचवली जातात. ऑक्सिजनही श्वसनक्रियेतून प्रत्येक पेशींपर्यंत पोहचवला जातो. तसेच पोषकतत्वांमुळे शरीरात ऊर्जानिर्मितीही होते. आणि सजीवांची वाढ व विकासही होतो. त्यामुळे पोषकतत्वे ही खूप आवश्यक आहेत. पोषकत्वे चयापचय क्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. कार्बोहायड्रेटस, प्रोटीन, जीवनसत्त्वे ही महत्त्वाची पोषकत्वे आहेत. बरं मला सांगा संतुलित आहाराचे शरीराला काय महत्व आहे? संतुलित आहारामध्ये कर्बोदके, मेद, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे असे घटक असतात. हे घटक शरीरातील विविध कार्य व्यवस्थित पार पाडतात. म्हणून संतुलित आहारामध्ये हे घटक असतील तर आपले आरोग्य चांगले राहते.