सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-1)

सजीव आणि जीवनक्रिया

views

3:37
आता आपण सजीव व सजीवांच्या जीवनप्रक्रियेविषयी विस्ताराने माहिती समजून घेऊ. मानवाच्या शरीरात पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था अशा विविध संस्था कार्य करत असतात. तसेच काही अंतर्गत व बाह्य अवयव कार्य करत असतात. या यंत्रणा प्रत्येक सजीवांमध्ये कार्यरत असतात. सजीवांच्या या संस्थेला कार्य करण्यासाठी उर्जेची खूप आवश्यकता असते. पेशीमध्ये असणाऱ्या तंतुकणिकांच्या मदतीने कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने यांपासून ऊर्जा मिळवली जाते. यासाठी ऑक्सिजनचीही गरज असते. हे सर्व घटक परिवहन संस्थेमार्फत पेशींपर्यंत पोहचवले जातात. नियंत्रण संस्था सर्व प्रक्रियेंवर नियंत्रण ठेवत असते. आपल्याला माहित आहे की, सजीवांना जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज असते. तसेच वनस्पतीही स्वतःचे अन्न हरितद्रव्याच्या मदतीने तयार करतात. त्यातील काही अन्न ते वापरतात तर काही अन्न हे फळे, पाने, खोड, मूळ यांमध्ये साठवून ठेवतात. अशा वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो. त्यापासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषकद्रव्ये, प्रथिने, जीवनसत्वे, स्निग्ध पदार्थ, खनिजे मिळतात. हे सर्व मिळवण्यासाठी आपण फळे, दुध, साखर, भाजीपाला, मका, गहू, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मध, बटाटे, रताळी, मिठाई इत्यादी पदार्थ खातो. या सर्व पदार्थापासून आपल्याला ऊर्जा मिळत असते. तसेच कर्बोदकेही मिळतात. कर्बोदकांमधून 4 किलोकॅलरी ग्रॅम (kcal / gm) इतकी ऊर्जा मिळते. मुलांनो, तुम्ही पाहिले असेल की, खेळ खेळताना मध्येच खेळाडू मध्यांतर घेतात व काही पदार्थांचे सेवन करतात. ते असे पदार्थ का घेत असावेत? कारण त्यामध्ये ग्लुकोज असते व त्यातून त्यांना ऊर्जा मिळते. आणि त्यांना लगेच तरतरी येते