सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-1)

पेशीविभाजन: एक आवश्यक जीवनप्रक्रिया

views

3:33
पेशीविभाजन: एक आवश्यक जीवनप्रक्रिया:- (Cell division:- an essential life process) आता आपण पेशीविभाजन जीवनप्रक्रियेमध्ये कसे महत्वाचे आहे ते जाणून घेऊया. यातील शरीरस्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन व कार्बनडायऑक्साईड या वायूची शरीरात आणि सभोवतालच्या वातावरणात देवाण-घेवाण सतत सुरु राहते. तर दुसरा स्तर म्हणजेच पेशीस्तरावर होणाऱ्या श्वसनामध्ये अन्नपदार्थाचे ऑक्सिजनच्या साहाय्याने किंवा ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त ऑक्सिडीकरण केले जाते.मुलांनो, तुम्हांला माहीतच असेल की, एखादी जखम झाली की तेथील उती ह्या आपले नेहमीचे कार्य करू शकत नाहीत. त्या भागातील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे तो भाग लालसर होतो. तसेच जखम झाल्यामुळे बऱ्याच पेशी ह्या नष्ट होतात व त्या ठिकाणच्या चेता दुखावल्या जातात आणि वेदना होतात. पण जस जशी जखम बरी होत जाते, तस तश्या तेथे नवीन पेशी तयार होतात. जखम झालेल्या आजूबाजूस पेशी वेगाने वाढतात. जशा प्राण्यांना जखमा होतात तश्याच वनस्पतींनाही जखमा होतात. तेथील नाश पावलेल्या उती वनस्पती विभाजनाने पुन्हा भरून निघतात.