सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-1)

विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा

views

4:03
विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा:- (Energy from different food components) मुलांनो, आता आपण पेशीअंगकाना विविध अन्नघटकांपासून मिळणाऱ्या उर्जेविषयी माहिती अभ्यासूया. आपण जास्त प्रमाणात कर्बोदकांचे सेवन केले की ती कर्बोदके यकृतात आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजेनच्या स्वरुपात साठवली जातात. अमिनो आम्लांचे अनेक रेणू एकमेकांना जोडल्यावर तयार होणाऱ्या महारेणूला ‘प्रथिन’ म्हणतात. प्राणिज पदार्थांपासून मिळणाऱ्या प्रथिनांना ‘फस्ट क्लास प्रथिने’ म्हणतात. प्रथिनांपासून सुद्धा 4 KCaL (किलोकॅलरी) एवढी ऊर्जा मिळते. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर परत अमीनो आम्ल तयार होतात. त्यानंतर ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जातात. आणि रक्तामार्फत प्रत्येक अवयव व पेशींपर्यंत पोहचवली जातात. वेगवेगळे अवयव व पेशी त्या अमिनो आम्लांपासून त्यांना किंवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात.