सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-1)

ATP

views

3:48
आता आपण ATP विषयी माहिती अभ्यासूया. ATP म्हणजे अॅडीनोसीन ट्रायफॉस्फेट व हा एक उर्जेने संपृक्त असा रेणू आहे. यामध्ये फॉस्फेटचे तीन रेणू एकमेकांना ज्या बंधांनी जोडलेले असतात त्या बंधात ऊर्जा साठवली जाते. हे रेणू पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठवले जातात. ATP हा रासायनिकदृष्ट्या अॅडीनोसीन रायबो न्यूक्लिओसाइड पासून तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू आहे. यामध्ये अॅडेनिन हा नत्रयुक्त रेणू, रायबोझ (C5H10O5) ही पेंटोज शर्करा व तीन फॉस्फेटचे रेणू असतात. उर्जेच्या आवशक्यतेनुसार ATP मधील फॉस्फेटच्या रेणूमधील बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते. म्हणून ATP ला उर्जेचे चलन असे म्हणतात.