प्रकाशाचे परावर्तन

बिंदूस्रोताच्या प्रतिमेचा अभ्यास

views

3:51
प्रकाशकिरण हे बिंदूस्रोतापासून सर्व दिशांनी निघताना दिसतात. त्यांपैकी काही किरण आरशावर पडून परावर्तित होतात आणि आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात. या परावर्तनामुळे हे प्रकाशकिरण आरशा मागील ज्या बिंदूपासून आल्यासारखे भासतात त्याच बिंदूवर बिंदूस्रोताची प्रतिमा तयार होते. त्यामुळे आकृतीत दाखवल्याप्रमाणे सपाट आरशावर लंबरूप पडणारे किरण लंबरूपातच परावर्तित होतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे M1M2 सपाट आरशासमोर O हा बिंदूस्रोत आहे. QR1 आणि QR2 हे दोन आपाती किरण R1S1 आणि R2S2 या मार्गांनी परावर्तित होतात. हे परावर्तित किरण जर मागे वाढवले तर O1 या बिंदूत छेदतात आणि E कडून पाहिल्यास ते O1 बिंदूतून आल्यासारखे भासतात. 'O' बिंदूपासून निघणारे इतर किरणही असेच परावर्तित होतात व O1 बिंदूपासून निघाल्यासारखे भासतात. म्हणून बिंदू O1 ही बिंदू O ची प्रतिमा आहे. याठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, 'परावर्तित किरण हे प्रत्यक्षपणे एकमेकांना छेदत नाहीत. म्हणून या प्रतिमेला आभासी प्रतिमा असे म्हणतात'. प्रतिमेचे आरशापासूनचे लंबरूप अंतर हे बिंदूस्त्रोताचे आरशापासूनच्या लंबरूप अंतराएवढेच असते.