प्रकाशाचे परावर्तन

गोलीय आरसे

views

3:05
आतापर्यंत आपण सपाट आरशाविषयी माहिती घेतली. आता आपण गोलीय आरशांची माहिती घेऊ. गोलाकार परावर्तनशील पृष्ठभागाचा एक भाग असतो. त्याचा काटछेद हा वर्तुळपाकळी असतो. काचेच्या एका पृष्ठभागावर परावर्तक लेप देऊन पृष्ठभाग चकचकीत केलेला असतो. मोटार-चालकास पाठीमागून येणारी वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा सपाट नसून गोलीय असतो. जत्रेत हास्यदालन मांडलेले असते. त्यातील आरसेही तुम्ही पाहिले असतील. या आरशांत आणि तुमच्या घरच्या आरशात काय फरक दिसतो? घरच्या आरशांत आपण जसे आहोत तसे दिसतो. हास्यदालनातील आरशांत आपण वेडेवाकडे दिसतो. हास्यदालनातील आरसे हे घरातील आरशांसारखे सपाट नसून वक्र असतात. ह्या गोलाकार आरशातील किंवा हास्यदालनात दिसणाऱ्या आरशातील प्रतिमा सपाट आरशातील प्रतिमेपेक्षा वेगळी दिसते.