प्रकाशाचे परावर्तन

निरीक्षण करा

views

3:48
आकृती 'अ' मध्ये दाखवल्याप्रमाणे AB ही वस्तू MN या अंतर्गोल आरशासमोर नाभी आणि वक्रता केंद्र यांच्यामध्ये ठेवली आहे. A पासून निघणारा आणि नाभीतून जाणारा आपाती किरण परावर्तनानंतर अक्षाला समांतर राहून QR मार्गाने परावर्तित होताना दिसतो. अक्षाला समांतर असणारा AS किरण परावर्तनानंतर नाभीतून ST मार्गाने जाऊन QR या परावर्तित किरणाला A1 बिंदूत छेदतो. म्हणजेच A बिंदूची प्रतिमा A1 बिंदूवर तयार होताना दिसते. B बिंदू हा मुख्य अक्षावर स्थित असल्याने त्याची प्रतिमा देखील मुख्य अक्षावरच असेल व A1 च्या सरळ वर म्हणजेच B1 बिंदूवर तयार होईल. A1 आणि B1 यांच्या दरम्यान असलेल्या बिंदूंच्या प्रतिमा A आणि B यांच्या दरम्यान तयार होतात. म्हणजेच AB वस्तूची A1B1 प्रतिमा तयार होते. यावरून समजते की, नाभी आणि वक्रता केंद्र यांच्यामध्ये वस्तू ठेवली असताना तिची प्रतिमा वक्रता केंद्राच्या पलीकडे मिळते. ही प्रतिमा उलटी आणि मूळ वस्तूपेक्षा मोठी असते. परावर्तित किरण एकमेकांना प्रत्यक्ष छेदतात. त्यामुळे ही वास्तव प्रतिमा पडद्यावर घेता येते.