प्रकाशाचे परावर्तन

अंतर्गोल व बहिर्गोल आरशाचे गुणधर्म

views

4:35
अंतर्गोल आरशाचे गुणधर्म व उपयोग: 1) आरशाच्या ध्रुव व नाभी यादरम्यान वस्तू असेल तर त्या वस्तूची प्रतिमा सुलट, आभासी व अधिक मोठी मिळते. म्हणून केशकर्तनालय, दातांचा दवाखाना या ठिकाणी अंतर्गोल आरसे वापरले जातात. 2) प्रकाश स्रोत नाभीपाशी ठेवल्यास प्रकाशाचा समांतर स्रोत मिळतो. उदा. बॅटरी, वाहनांचे हेडलाईट 3) प्रकाशाचा स्रोत अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मध्याच्या थोडासा पलीकडे ठेवला जातो त्यामुळे तीव्र प्रकाश झोत मिळतो. उदा. फ्लड लाईटस् 4) अंतर्वक्र आरशावरून परावर्तित सूर्यकिरणे नाभीय प्रतलात एकत्र येतात. उदा. सौर उपकरणे बहिर्गोल आरशाचे गुणधर्म व उपयोग: 1) गाड्यांवर उजव्या व डाव्या बाजूला असणारे आरसे हे बहिर्वक्र असतात. कारण त्यामुळे दुरवरूनही या आरशात प्रतिमा लहान परंतु सुलटी दिसते. 2) मोठे बहिर्वक्र आरसे दुकानात बसवलेले असतात. चिन्ह संकेत: कार्टेशिअन चिन्ह संकेतानुसार आरशाचा ध्रुव (P) हा आरंभ बिंदू मानतात. तर आरशाचा मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा x अक्ष घेतात. 1) वस्तू नेहमी, आरशाच्या डावीकडे ठेवतात व मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात. 2) आरंभबिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात तर डावीकडे मोजलेली अंतरे ऋण मानली जातात. 3) मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे म्हणजेच ऊर्ध्व अंतरे ही धन असतात. 4) मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेली अंतरे म्हणजेच अधोअंतरे ही ऋण असतात. 5) अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर ऋण असते तर बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर धन असते. चा प्रकाशझोत वापरून डॉक्टर दात, डोळे, कान यांवर प्रकाश एकाग्र करतात. सौर उपकरणांमध्ये अभिसारित प्रकाशाचा उपयोग केला जातो.