प्रकाशाचे परावर्तन

गोलीय आरशाशी संबंधित संकल्पना

views

3:25
ध्रुव: या आकृतीमध्ये P हा बिंदू आरशाचा ध्रुव आहे. गोलीय आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस त्या आरशाचा ध्रुव म्हणतात. वक्रता केंद्र: आकृतीत दाखवल्याप्रमाणे c बिंदू आरशाचे वक्रता केंद्र आहे. म्हणजेच गोलीय आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास त्या आरशाचे वक्रता केंद्र म्हणतात. वक्रता त्रिज्या: आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता त्रिज्या असे म्हणतात. आकृतीत CP व CA ह्या आरशाच्या वक्रता त्रिज्या आहेत. मुख्य अक्ष: आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र यातून जाणाऱ्या सरळ रेषेस आरशाचा मुख्य अक्ष म्हणतात. आकृतीतील PM हा आरशाचा मुख्य अक्ष आहे. मुख्य नाभी: अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परवर्तनानंतर मुख्य अक्षावर आरशासमोर ज्या एका विशिष्ट बिंदूत मिळतात त्या बिंदूला अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. आकृतीतील F हा बिंदू मुख्य नाभी आहे. बहिर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर आरशामागील मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून आल्यासारखे भासतात. या बिंदूला आपण बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी असे म्हणतो. नाभीय अंतर: गोलीय आरशाचा ध्रुव व आरशाची मुख्य नाभी यांच्यातील अंतराला त्या आरशाचे नाभीय अंतर असे म्हणतात. ते स्मॉल इंग्रजी अक्षर f ने दर्शवतात. नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. आपण गोलीय आरशाच्या संदर्भातील अनेक संज्ञा पाहिल्या. तर आता तुम्ही अंतर्गोल आणि बहिर्गोल आरशांच्या नाभींतील मुख्य फरक कोणता आहे ते सांगा?