प्रकाशाचे परावर्तन

जरा डोके चालवा

views

4:56
मला सांगा व्यक्ती जर सपाट आरशासमोर उभी राहिली, तर त्या व्यक्तीची प्रतिमा कशी तयार होते? त्या प्रतिमेचे स्वरुप कसे असते? सपाट आरशासमोर उभे राहिले तर आपली सुलटी व तेवढ्याच आकाराची प्रतिमा आरशात दिसते. पण आपली उजवी बाजू ही डावीकडे व डावी बाजू ही उजवीकडे दिसते. सपाट आरशासमोर उभे राहिले तर प्रतिमेच्या आकारात कोणताच बदल होत नाही. पण आपला उजवा हात प्रतिमेमध्ये डावा दिसतो तर डावा हात प्रतिमेमध्ये उजवा दिसतो. जर्मन शास्त्रज्ञ जस्टस वॅान लीबिग यांनी साध्या काचेच्या तुकड्याच्या एका सपाट पृष्ठभागावर चांदीचा लेप दिला आणि आरसा तयार केला यालाच 'रजतकाच परावर्तक' असे म्हणतात. आता आपण प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम पाहूया.1) आपाती प्रकाशकिरण, परावर्तित प्रकाशकिरण आणि परावर्तक पृष्ठभागास आपतन बिंदूवर काढलेली स्तंभिका एकाच प्रतलात असतात आणि आपाती प्रकाशकिरण आणि परावर्तित प्रकाशकिरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूंना असतात. 2) आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापांचे असतात.