प्रकाशाचे परावर्तन

किरणाकृती

views

4:06
किरणाकृतीच्या मदतीने गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास करता येतो. किरणाकृती म्हणजेच प्रकाशकिरणाच्या मार्गक्रमणाचे परावर्तनाच्या नियमांवर आधारित असेलेल विशेष चित्रीकरण होय" हे चित्रीकिरण करण्यासाठी काही नियम वापरावे लागतात. तर आता आपण गोलीय प्रतिमा मिळवण्यासाठी ज्या किरणाकृती काढाव्या लागतात त्यांच्या नियमांचा अभ्यास करूया. नियम1)जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. प्रकाशकिरण आरशाच्या मुख्य अक्षास समांतर आहे. त्यामुळे परावर्तित प्रकाशकिरण मुख्य नाभीतून जाताना दिसतो आहे. जर आरसा अंतर्गोल असेल तरच असे होते. पण जर आरसा बहिर्गोल असेल तर प्रकाशकिरण त्याच्या मुख्य नाभीतून आल्यासारखा वाटतो. नियम2) जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. जर आपाती प्रकाशकिरण अंतर्गोल आरशाच्या मुख्य नाभीच्या दिशेने जात असेल तर परावर्तित प्रकाशकिरण आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर जातो. नियम3) जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर, परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो.