प्रकाशाचे परावर्तन

प्रकाशाचे अपसरण आणि अभिसरण

views

4:07
प्रकाशाचे अपसरण म्हणजे एकाच बिंदूस्रोतातून प्रकाशकिरणांचे एकमेकांपासून दूर पसरणे. आणि प्रकाशाचे अभिसरण म्हणजे प्रकाशकिरणांचे एका बिंदूपाशी एकत्र येणे. प्रकाशाच्या अभिसरणाचा झोत वापरून डॉक्टर दात, कान, डोळे यांची तपासणी करतात. तसेच सौर उपकरणातही याचा वापर होतो. (अ) सर्वप्रथम या आकृतीत पहा. इथे दाखवल्याप्रमाणे काडेपेटीतील पाच काड्या घ्या. त्यांची रसायन अवलेपित टोके म्हणजेच काड्यांची गुले एका बिंदूपाशी एकत्र येतील अशी मांडणी करा. याठिकाणी रसायन अवलेपित टोके अभिसारित झालेली दिसत आहेत. (ब) आता काड्यांची मांडणी अशा प्रकारे करा की, त्या काड्यांची दुसरी टोके एकत्र असतील आणि रसायन अवलेपित टोके एकमेकांपासून दूर असतील. येथे रसायन अवलेपित टोके अपसारित झाली आहेत. अशाच प्रकारे प्रकाशाचे अपसरण व अभिसरण होत असते. अंतर्वक्र आरशाला अभिसारी आरसा असेही म्हणतात. कारण मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तन झाल्यानंतर एका बिंदूपाशी अभिसारित होतात.