कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य

कार्बनचा आढळ

views

5:20
लॅटिन भाषेत ‘कार्बो’ म्हणजे कोळसा. म्हणून या मूलद्रव्याला कार्बन हे नाव देण्यात आले. निसर्गामध्ये कार्बन हा मुक्त व संयुगावस्थेत आढळतो. मुक्त अवस्थेत कार्बन हिरा, ग्रॅफाइट या अवस्थेत आढळतो. तर संयुगावस्थेत कार्बन खालील संयुगांमध्ये आढळतो. 1. कार्बन डायऑक्साईड, कॅल्शिअम कार्बोनेट, मार्बल कॅलामाइन. 2. दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू इत्यादी जीवाश्म इंधने. 3. पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद अशी कार्बनी पोषणद्रव्ये. 4. नैसर्गिक धागे, सुती कपडे, लोकर, रेशीम यांमध्येही कार्बन आढळतो. विज्ञान कुपी: आपल्या पृथ्वीच्या कवचामध्ये 0.27 % कार्बन असतो. तो कार्बोनेट, कोळसा, पेट्रोलियम या स्वरूपात आढळतो. तर वातावरणात असणारे कार्बनचे प्रमाण कार्बन डायऑक्साइडच्या स्वरूपात सुमारे 0.03% एवढे असते. महासागरांच्या तळाशी असलेल्या काही प्रकारच्या वनस्पती, पाण्यातील कार्बनचे रूपांतर कॅल्शिअम कार्बोनेटमध्ये करीत असतात. कार्बनचे गुणधर्म: कार्बनची अपरूपता: निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपांत आढळतात. त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात. मूलद्रव्यांच्या या गुणधर्माला अपरूपता असे म्हणतात. कार्बनप्रमाणेच सल्फर, फॉस्फरस ही मूलद्रव्ये सुद्धा अपरूपता दाखवत असतात. कार्बनची अपरूपता स्फटिकरूप व अस्फटिकरूप अशा दोन प्रकारची असते. तर आता आपण त्याची अधिक माहिती घेऊया.