कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य

हायड्रोकार्बन्स: मूलभूत सेंद्रिय संयुगे

views

3:15
जास्तीत जास्त सेंद्रिय संयुगांत कार्बन व हायड्रोजन या मूलद्रव्यांचा समावेश असतो. म्हणून या मूलभूत संयुगांना ‘मूळसंयुगे’ असे म्हणतात. यांना सेंद्रिय कार्बन असेही म्हणतात. कार्बनचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,4 आहे. म्हणून कार्बन अणूच्या दुसऱ्या कक्षेत चार इलेक्ट्रॉन मिळाले, तर शेवटच्या कक्षेतील अष्टक पूर्ण झाल्याने त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण त्याच्या जवळच्या निष्क्रीय वायू (निऑन 2,8) प्रमाणे स्थिर होते. म्हणून कार्बनची संयुजा 4 आहे. म्हणजेच या ठिकाणी इलेक्ट्रॉनची देवाण-घेवाण होत नाही तर त्यांची भागीदारी होते. म्हणजेच तो दुसऱ्या कार्बनसोबत अथवा दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूसोबत चार सहसंयुज बंध (Covalent bond) तयार करू शकतो.