कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य

कार्बनची विद्राव्यता

views

2:56
कार्बन हा कोणकोणत्या पदार्थांमध्ये विद्राव्य आहे? हे पाहण्यासाठी आपण एक कृती करूया. साहित्य: या प्रयोगासाठी 3 शंकूपात्रे, ढवळणी हे साहित्य घ्या. रसायने: पाणी, रॉकेल, खाद्यतेल, कोळशाची पूड किंवा भुकटी घ्या. कृती: प्रथम 3 शंकूपात्रे घेऊन त्यामध्ये एका शंकूपात्रात खाद्यतेल, एकामध्ये पाणी, व एकामध्ये रॉकेल घ्या. आता प्रत्येक शंकूपात्रामध्ये अर्धा चमचा कोळशाची पूड टाका व ढवळणीने ढवळा. पहा, पाणी, रॉकेल व खाद्यतेल यांपैकी कोणत्याच द्रावणात कोळशाची पूड विरघळत नाही. कार्बन कोणत्याही द्रावणात विरघळत नाही. आता आपण कार्बनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया कशी होते ते प्रयोगाद्वारे समजून घेऊ. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोळसा पेटवून घ्या. कोळसा पेटल्यानंतर त्यातून निघणाऱ्या वायूवर ओला निळा लिटमस पेपर धरा. आता तुम्ही मला सांगा कोळसा पेटल्यावर त्याची हवेतील कोणत्या वायूबरोबर अभिक्रिया होते?