कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य

ग्रॅफाइट

views

5:44
रशिया, न्यूझीलंड, अमेरिका व भारतामध्ये नैसर्गिक स्वरूपात ग्रॅफाइट आढळते. ग्रॅफाइटचा शोध ‘निकोलस जॅक्स कॉन्टी’ यांनी 1795 साली लावला. पेन्सिलमध्ये वापरले जाणारे लेड हे ग्रॅफाइट व मातीपासून बनवलेले असते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्रत्येक अणू हा इतर तीन अणूंसोबत बंधित आहे. तो अणू असा बंधित आहे की त्यामुळे प्रतलीय षटकोन रचना तयार झालेली दिसून येते. ग्रॅफाइटचा स्फटिक हा अनेक पापुद्रयांचा किंवा अणूच्या स्तरांचा बनलेला असतो. दाब दिल्यानंतर ग्रॅफाइटचे हे स्तर एकमेकांवर घसरतात. ग्रॅफाइटच्या एका पापुद्र्याला ‘ग्राफीम’ असे म्हणतात. विद्युतधारा ग्रॅफाइटमधून वाहत असते, हे समजण्यासाठी आपण एक कृती करूया.