कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य

कार्बन डायऑक्साइडचे भौतिक गुणधर्म

views

4:36
1) कार्बन डायऑक्साइडला वास, रंग नसतो. 2) कार्बन डायऑक्साइड वायू हवेपेक्षा जड असतो. 3) कार्बन डायऑक्साइड पाण्यात अल्प प्रमाणात विरघळतो. 4) कार्बन डायऑक्साइड वायू स्वतः ज्वलनशील नाही व ज्वलनास मदतही करत नाही. कार्बन डायऑक्साइडचे रासायनिक गुणधर्म: 1) CO2 च्या वायुपात्रात जळती मेणबत्ती ठेवली तर ती विझते. 2) या वायूत चुन्याची निवळी टाकली तर ती पांढरी होते. व पांढऱ्या रंगाचे कॅल्शिअम कार्बोनेट तयार होते. 3) या वायूचा उपयोग करून पाण्याच्या मदतीने H2CO3 कार्बोनिक आम्ल तयार होते. 4) CO2 मध्ये ओला निळा लिटमस लाल होतो व लाल लिटमस लालच राहतो. 5) सोडियम हायड्रॉक्साईडच्या जलीय द्रावणातून कार्बन डायऑक्साइड पाठवला तर सोडियम कार्बोनेट म्हणजेच धुण्याचा सोडा मिळतो. या सोडियम कार्बोनेटच्या रासायनिक अभिक्रियेचे समीकरण असे आहे: 2NaOH + CO2 Na2CO3 + H2O 6) सोडियम कार्बोनेटच्या पाण्यातील द्रावणातून जर CO2 पाठवला तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा मिळतो याचे रासायनिक समीकरण असे आहे. Na2CO3+H2O + CO2 2NaOHCO3 7) कार्बन डायऑक्साइडची पाण्याशी अभिक्रिया होऊन H2CO3 कार्बोनिक आम्ल तयार होते. याची रासायनिक अभिक्रिया ही आहे: CO2 + H2O H2CO3