कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य

अस्फटिकी अपरूपे

views

3:15
आतापर्यंत आपण कार्बनच्या स्फटिकी रूपांविषयी माहिती घेतली आहे. आता आपण कार्बनच्या अस्फटिकी रूपांविषयी माहिती घेऊ. याप्रकारच्या स्वरूपातील कार्बनची रचना ही नियमित नसते. दगडी कोळसा, लोणारी कोळसा, कोक, ही कार्बनची अस्फटिकी रूपे आहेत. त्यांची आपण अधिक माहिती घेऊया. 1) दगडी कोळसा: दगडी कोळसा हे एक जीवाश्म इंधन आहे. यामध्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन असतात. यात थोडया प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर हेही असतात. हा कोळसा स्थायूरूपात सापडतो. याचे चार प्रकार पुढीलप्रमाणे आहेत: पीट: कोळसा तयार होण्याची पाहिली पायरी म्हणजे ‘पीट’ तयार होणे. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते व कार्बनचे प्रमाण 60% पेक्षाही कमी असते. म्हणून हा कोळसा कमी उष्णता देतो. लिग्नाइट: जमिनीच्या आत वाढता दाब व तापमान यांमुळे पीटचे रुपांतर ‘लिग्नाइट’ मध्ये झाले. यामध्ये कार्बनचे प्रमाण 60 ते 70 % असते. त्यामुळे कोळसा तयार होण्याची दुसरी पायरी म्हणजेच ‘लिग्नाइट’ होय.