कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य

कार्बन डायऑक्साइड

views

3:51
कार्बन डायऑक्साईड हा वायू हवेमध्ये मुक्त स्वरूपात आढळून येतो. उच्छ्वासावाटे बाहेर पडणाऱ्या हवेत सुमारे 4% कार्बन डायऑक्साइड हा वायू असतो. खडू, शहाबादी फरशी यामध्ये CO2 संयुगावस्थेमध्ये आढळून येतो. लाकूड, कोळसा ह्या इंधनांच्या ज्वलनातूनही CO2 वायू बाहेर टाकला जातो. कार्बन डायऑक्साइडचे रेणुसूत्र: CO2 आहे. तर रेणूवस्तुमान: 44 आहे. कार्बन डायऑक्साइडचा द्रवणांक: -56.6०C इतका आहे. आता आपण कार्बन डायऑक्साईड वायू कसा तयार होतो ते प्रयोगाद्वारे समजून घेऊ. कार्बन डायऑक्साईड वायू तयार करणे: साहित्य: सर्वप्रथम स्टँड, गोलबुडाचा चंबू, थिसल नरसाळे, वायूवाहक नलिका, वायुपात्रे हे साहित्य घ्या. रसायने: या प्रयोगासाठी कॅल्शिअम कार्बोनेट, म्हणजेच शहाबादी फरशीचे तुकडे किंवा संगमरवराचे तुकडे किंवा चुनखडी असेल तरी चालेल आणि विरल हायड्रोक्लोरिक आम्ल हे रसायन घ्या. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका गोल बुडाच्या चंबूत कॅल्शिअम कार्बोनेटचे (चुनखडीचे) तुकडे टाका. आणि साहित्याची रचना करा. चंबूला दोन छिद्रे असलेले बूच लावा. एका छिद्रातून चंबूच्या तळापर्यंत जाणारे नरसाळे तर दुसऱ्या छिद्रातून एक काचेची वायुवाहक नळी बसवा. काचेच्या नळीचे दुसरे टोक वायुपात्रात सोडा. आता थिसल नरसाळयातून चंबूमध्ये सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल टाका. नरसाळयाचे टोक आम्लात बुडेल असे सोडा. यानंतर कॅल्शिअम कार्बोनेट आणि हायड्रोक्लोरिक आम्ल यांच्यात रासायनिक अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायु हा वायूपात्रात जमा होतो.