कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य

बायोगॅस संयंत्र

views

2:32
आजच्या काळात बायोगॅस हा अतिशय कमी खर्चाचा इंधनप्रकार म्हणून ओळखला जातो. बायोगॅस संयंत्रामध्ये जनावराचे शेण, पालापाचोळा, ओला कचरा यांचे विनॉक्सी जिवाणूंमार्फत विघटन होते. त्यापासून मिथेन वायू तयार होतो. यालाच बायोगॅस असे म्हणतात. बायोगॅस हा स्वयंपाकाच्या गरजा भागवणारा स्वस्त इंधन पर्याय आहे. बायोगॅस संयंत्र हे वीजनिर्मितीसाठी सुद्धा वापरले जाते. बायोगॅसमध्ये सुमारे 55% ते 60% मिथेन वायू असतो व उर्वरित भाग कार्बन डायऑक्साइडचा असतो. बायोगॅस हे सोईचे इंधन तर आहेच शिवाय गॅस तयार होताना उत्तम खतही तयार होते.