कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य

मिथेन

views

3:56
मिथेन वायू हा अतिशय उपयोगी वायू आहे. मिथेन वायूचे ज्वलन झाल्यानंतर त्यातून CO2 वायू खूप कमी प्रमाणात बाहेर पडतो. तर आता आपण त्याविषयी अधिक विस्ताराने माहिती घेऊ. आढळ: 1) नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87 % मिथेन वायू आढळतो. 2) जैविक पदार्थाच्या हवेच्या अणूपस्थितीत होणाऱ्या विघटनामुळे CH4 मिथेन वायू निर्माण होतो. 3) बायोगॅस तसेच कोळशाच्या खाणीमध्येही मिथेन वायू आढळून येतो. 4) मिथेन वायू दलदलीच्या पृष्ठभागावर आढळून येतो. म्हणून याला ‘मार्श गॅस’ असेही म्हणतात. 5) प्रयोगशाळेमध्ये हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साइड यांचे मिश्रण 300०C ला निकेल या उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये तापवले तर मिथेन वायू तयार होतो. 6) मिथेन नैसर्गिक वायूच्या भंजक ऊर्ध्वपतनाने मिळवता येतो. म्हणजेच कार्बनचा प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन, चार हायड्रोजन अणूंबरोबर चार इलेक्ट्रॉनची भागीदारी करून चार C-H बंध तयार होतो. अशा प्रकारे आपल्याला मिथेन वायू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून मिळतो.