अनुवंशिकता व परिवर्तन

आनुवंशिकता

views

05:28
तुम्ही तुमच्या आजूबाजूला प्राणी, पक्षी पाहिले असतील. उदा. कुत्रा: कुत्र्याची पिल्ले ही कुत्र्यासारखीच दिसतात. चिमणीची, कबुतराची पिल्ले ही त्यांच्यासारखीच दिसतात. तर मानवाची संतती ही मानवासारखीच दिसते. म्हणजेच माता-पित्याची शारीरिक आणि मानसिक जैविक लक्षणे जनुकांद्वारे संततीमध्ये वा पुढील पिढीत संक्रमित होतात. यालाच आनुवंशिकता असे म्हणतात. या आनुवंशिकतेमुळे प्रत्येक सजीवांची संतती त्यांच्याप्रमाणेच होते. आनुवंशिक लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण: आता आपण आनुवंशिक लक्षणे व या लक्षणांचे प्रकटीकरण कसे होते ते पाहूया. आई-वडील व त्यांच्या संततीमध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या आढळून येतात पण भेदही आढळून येतात. हे सर्व आनुवंशिकतेमुळेच घडून येते. तर सांगा बरं सजीवांमध्ये विशिष्ट लक्षणे अथवा वैशिष्ट्ये कशी प्रकट होतात?