अनुवंशिकता व परिवर्तन

राष्ट्रीय आरोग्य अभियान

views

04:35
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे एप्रिल 2005 ला तर शहरी आरोग्य अभियान 2013 पासून सुरु करण्यात आले. या अभियानाची मुख्य उद्दिष्टे ही ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करणे, विविध रोग व आजारांवर नियंत्रण मिळवणे, आरोग्याविषयी जनजागृती करणे व विविध योजनांच्या माध्यमातून रुग्णांना अर्थसाहाय्य देणे हे आहे. उदा. प्रसूती दरम्यान महिलेच्या आरोग्याची काळजी घेतली जाते व प्रसूती झाल्यानंतर महिलेला अर्थसाहाय्य दिले जाते. अशा बऱ्याच योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चालवल्या जातात. एकजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग (एकजनुकीय विकृती): सामान्य जनुकामध्ये उत्परिवर्तन म्हणजेच अचानक बदल होतो. त्याचे रूपांतर सदोष जनुकात होते व त्यामुळे जे विकार होतात त्यांना एकजनुकीय विकृती असे म्हणतात. याप्रकारच्या 4000 हून जास्त एकजनुकीय विकृती आढळून आल्या आहेत. प्रत्येक जनुक ठरावीक उत्पादिते तयार करते. मात्र सदोष जनुकांमुळे शरीरात जनुकांमार्फत होणारी उत्पादिते तयार होत नाहीत किंवा काही प्रमाणात तयार होतात. या उत्पादितांच्या कमीपणामुळे शरीरामध्ये रासायनिक प्रक्रिया घडून येत नाहीत. अनावश्यक पदार्थ हे शरीरामध्ये साचून राहतात. त्यामुळे वेगवेगळ्या विकृती निर्माण होतात. अशा रोगांना चयापचयाचे जन्मजात विकार असे म्हणतात. कोवळ्या वयामध्ये हे विकार जीवघेणे ठरू शकतात. अशा प्रकारच्या रोगांची उदाहरणे म्हणजे हचिनसन्स रोग, टेसॅक्स रोग, गॅलेक्टोसेमिया, फेनिल किटोनमेह, सिकलसेल अॅनिमिया (दात्रपेशी पांडूरोग), सिस्टिक फायब्रॉसिस (पुटी तंतुभवन), वर्णकहीनता, हीमोफिलीया, रातांधळेपणा इत्यादी आहेत. आता आपण यातील काही रोगांविषयी माहिती घेऊ.