अनुवंशिकता व परिवर्तन

आर.एन.ए. (Ribo Nuclic Acid)

views

04:02
आता आपण आर. एन.ए. विषयी माहिती घेऊ. आर.एन.ए. हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्युक्लीक आम्ल आहे. ते रायबोज न्यूक्लीओटाइड, धाग्यांचे बनलेले असते. हे आम्ल रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि ग्वानीन, सायटोसिन अॅडेनिन व युरॅसिल या चार नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असते. रायबोझ शर्करा, फॉस्फेटचा रेणू, एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयुगातून न्युक्लीक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजेच न्युक्लीओटाइड तयार होते. अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून आर.एन.ए. चा महारेणू तयार होतो. ही आकृती पहा. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे आर.एन.ए. (R.N.A) च्या कार्यप्रणालीनुसार त्याचे तीन प्रकार आहेत. रायबोझोमल आर.एन.ए., मेसेंजर आर.एन.ए., ट्रान्सफर आर.एन.ए. (TRNA). 1) रायबोझोमल आर.एन.ए: रायबोझोम हा अंगकाचा घटक असून तो आर.एन.ए चा रेणू आहे. रायबोझोम प्रथिन संश्लेषणाचे काम करतो. 2) मेसेंजर आर.एन.ए: पेशी केंद्रकापासून पेशीद्रव्यातील रायबोझोमपर्यंत प्रथिननिर्मितीचे संदेश नेणारा दूत म्हणून मेसेंजर आर.एन.ए कार्य करतो.