अनुवंशिकता व परिवर्तन

मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग

views

04:14
मेंडेलने जे प्रयोग केले त्यामध्ये त्यांनी विरुद्ध लक्षणाची एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडांमध्ये संकर घडवून आणला. अशा प्रकारच्या संकराला एकसंकर असे म्हणतात. एकसंकर गुणोत्तराचा अभ्यास करण्यासाठी आपण एक उंची हे लक्षण घेऊन उंच असणाऱ्या व उंची कमी असणाऱ्या वाटाण्याच्या झाडाचे उदाहरण घेऊ. जनक पिढी (P1): एकसंकरासाठी उंचीचा गुणधर्म वापरण्यात आला. जनक पिढी (p1) मध्ये उंच उंची असणारी आणि बुटकी उंची असणारी झाडे संकरासाठी वापरण्यात आली. तर पहिली जनक पिढी p1 या संकर ने दर्शवली जाते. उंच व बुटक्या झाडांच्या संकरानंतर पहिली पिढी (F1) ही तयार होते. तर F1 पिढीतील सर्व झाडे उंच होती व त्यामुळे बुटकी झाडे तयार झालीच नाही. मेंडलने उंच असणे याला प्रभावी लक्षण म्हटले आहे. तर बुटके असणे याला अप्रभावी लक्षण म्हटले आहे. या लक्षणासाठी कारणीभूत असणारे घटक जोडीने आढळतात असे मत मेंडेलने मांडले आहे. त्यामुळे या घटकांना आता ‘जनुके’ असे म्हटले जाते. हा प्रयोग ‘पनेट स्क्वेअर’ पद्धतीने खालीलप्रमाणे मांडण्यात आला.