अनुवंशिकता व परिवर्तन

सिकलसेल आजार

views

02:27
महाराष्ट्रामध्ये सिकलसेल अॅनिमिआचे जवळपास 2.5 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. आणि महाराष्ट्रातील जवळपास 21 जिल्हे या आजाराने प्रभावित असून यामध्ये विदर्भातील 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. या आजाराने बाधित व्यक्तींचे दोन प्रकार असतात. सिकलसेल वाहक व्यक्ती(AS) कॅरियर आणि सिकलसेल पीडित व्यक्ती(SS) सफरर. आता आपण सिकलसेल आजाराची लक्षणे पाहूया. सिकलसेल आजाराची लक्षणे: या आजारामध्ये हातापायांवर सूज येणे, सांधे दुखणे, खूप वेदना होणे, सर्दी व खोकला सतत होणे, चेहरा निस्तेज दिसणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. सिकलसेल हा आजार AA = सामान्य (Normal), AS = वाहक(Carrier), SS = पीडीत (Sufferer) या संकेतचिन्हाने दाखवता येतो. हा तक्ता पाहा. या तक्त्यात अशा आजाराने पीडीत असल्यास अपत्य निर्मितीवर काय परिणाम होतो ते दिले आहे. त्याचे नीट निरीक्षण करा.