अनुवंशिकता व परिवर्तन

तंतुकणिकीय विकृती

views

04:18
आता आपण तंतुकणिकीय विकृतीबद्दल माहिती घेऊया. पेशीमधील तंतुकणिकांमध्ये DNA चा रेणू असतो. यामधील जनुकात उत्परिवर्तनाने विकृती येऊ शकते. ज्यावेळेस भ्रूण विकसित होतो तेव्हा मातेकडून येणाऱ्या अंडपेशीतूनच तंतुकणिका येत असल्याने अशा विकृती आईकडूनच संततीमध्ये येत असतात. उदा: लेबेरची आनुवंशिक चेताविकृती बहुजकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती (बहुघटकीय विकृती): एकाच वेळी एकापेक्षा जास्त जनुकांमध्ये बदल घडून आल्यामुळे बहुघटकीय विकृती निर्माण होतात. अशा विकारांत गर्भावस्थेत बालकावर आजूबाजूच्या पर्यावरणातील घातक घटकांचा परिणाम झाला तर या विकृती तीव्र स्वरूप धारण करतात. उदा: दुभंगलेले म्हणजेच दोन भागात विभागले गेलेले ओठ, दुभंगलेली टाळू, जठराचे संकोचन, पाठीतील कण्याचे दोष, रक्तदाब, मधुमेह, दमा, हृदयविकार, अतिस्थूलता अशा विकृती निर्माण होऊ शकतात. आनुवंशिकतेच्या मेन्डेलीयन आकृतिबंधापेक्षा संततीकडे होणारे हस्तांतरण वेगळेच होते. पर्यावरण, जीवनशैली आणि जनुकातील वेगवेगळे दोष यांच्या एकत्रितपणे होणाऱ्या परिणामातून बहुघटकीय विकृती उद्भवतात.