अनुवंशिकता व परिवर्तन

अनुवंशिक विकृती

views

05:42
गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परीवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजे आनुवंशिक विकृती होय. आनुवंशिक विकृतीमध्ये गुणसूत्राचे आधिक्य किंवा कमतरता, गुणसूत्राच्या एखाद्या भागाचा लोप किंवा त्याचे स्थानांतरण अशा स्थितीचा समावेश होतो. उदाहरणार्थ : दुभंगलेले ओठ, वर्णकहीनता ही शारीरिक व्यंगे असतात. तर सिकलसेल अॅनेमिया, हिमोफिलिया यासारखे शरीरक्रियांतील दोष ही आनुवंशिक विकृतीची उदाहरणे आहेत. माणसामध्ये 46 गुणसूत्रे असतात म्हणजे गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. या गुणसूत्रांच्या जोड्यांचा आकार व त्यांचे आकारमान यात विविधता असते. या जोड्यांना अनुक्रमांक दिलेले असतात. गुणसूत्रांच्या 23 जोड्यांपैकी 22 जोड्या अलिंगी गुणसूत्रांच्या तर 1 जोडी ही लिंग गुणसूत्राची असते. स्त्रियांमध्ये ही गुणसूत्रे 44+XX अशी दाखवतात आणि पुरुषांमध्ये ही गुणसूत्रे 44+Xy अशी दाखवतात. हा तक्ता पाहा (16.8 मानवाच्या सामान्य गुणसूत्रांचा तक्ता) या तक्त्यामध्ये मानवाच्या गुणसूत्रांच्या 23 जोड्या दाखवल्या आहेत. योहान मेंडेलने त्याच्या प्रयोगात कारकांचे म्हणजेच जनुकांचे प्रभावी व अप्रभावी असे दोन प्रकार सांगितले आहेत. मानवी पेशीतील गुणसूत्रांची संख्या, त्याचे लिंगसापेक्ष प्रकार, तसेच त्यावर असणाऱ्या जनुकांचे प्रभावी व अप्रभावी प्रकार या बाबींचा विचार केला तर आनुवंशिक विकृती कशा उद्भवतात व त्यांचे संक्रमण कसे होते हे लक्षात येते.