जैवतंत्रज्ञानाची ओळख

प्राणी ऊती

views

05:29
प्राणी ऊतींचे वर्गीकरण मुख्य दोन गटांत, म्हणजे सरल ऊती व जटिल ऊती यांत केले जाते. प्राण्यांचे शरीर हे एक संघटनानुसार कार्य करीत असते. त्यामध्ये रक्तवाहिन्या, हृद्य, आतडे हे सर्व घटक एकत्र येऊन आपले कार्य करत असतात. हृद्य, रक्तवाहिन्या, आतडे हे शरीराच्या आतल्या भागात असतात म्हणून ते आपल्याला दिसत नाहीत. प्राण्याच्या शरीरात अनेक प्रकारचे अवयव एकत्र येऊन कार्य करत असतात. फुफ्फुसे, श्वसननलिका असे अवयव काही विशिष्ट स्नायूंच्या मदतीने आकुंचन व शिथलीकरणामुळे श्वसनाचे कार्य पार पाडत असतात. विविध प्रकारच्या ऊती प्राण्याच्या शरीरात अवयवांमध्ये विविध प्रकारची कार्ये पार पाडत असतात. प्राण्यांचे शरीरात अभिस्तर ऊती, संयोजी ऊती, स्नायू ऊती व चेता ऊती या चार प्रकारच्या मुख्य ऊती असतात. शरीरामधील रक्त हे एक संयोजी ऊतीचाच प्रकार आहे. या संयोजी ऊतींमुळे रक्ताचे कार्य सुरळीत पार पाडले जाते. कारण रक्त हे शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे प्रवाहित होत असते. त्याचबरोबर ते अनेक पदार्थ वाहून नेत असते. ऑक्सिजन व पोषकद्रव्यांचे सर्व पेशीकडे वहन हे रक्त करत असते. शरीराच्या सर्व भागात तयार होणारे टाकाऊ पदार्थ वृक्काकडे उत्सर्जनासाठी पाठवले जातात. मुलांनो, जर विशालन भिंगातून तुमच्या तळहाताच्या मागच्या त्वचेचे निरीक्षण केले तर एकमेकांना घट्ट चिकटून असलेले चौकोनी, पंचकोनी, आकार दिसतात. मात्र हे आकार आपल्याला अस्पष्ट दिसतात.