जैवतंत्रज्ञानाची ओळख

वनस्पती ऊती

views

04:23
प्राण्यांची वाढ ही ठरावीक वयापर्यंत होते व शरीराच्या सर्व भागात सारखीच होते. मात्र वनस्पती वाढ ही अमर्याद असते. ती सगळीकडे सारखीच होत नाही. वनस्पतींची वाढ ठरावीक ठिकाणीच का होत असते? वनस्पतींची वाढ ही त्यांच्या मूळ व खोडांच्या अग्रभागी दिसून येते. याचे कारण म्हणजे अग्रभागात वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ऊती असतात. पेशीच्या विभाजन क्षमतेनुसार वनस्पती ऊतींचे विभाजी ऊती व स्थायी ऊती असे वर्गीकरण केले जाते. जेथे विभाजी ऊती असतात तेथेच वाढ होत असते. आता ही बाजूची आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन वायूपात्रे घ्या व त्यावर एक-एक कांदा तळाच्या भागाकडून पाण्यात बुडेल असा ठेवा. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी दोन्ही कांद्यांच्या मुळांची लांबी मोजून नोंद घ्या. चौथ्या दिवशी दुसऱ्या वायूपात्रातील कांद्याची मुळे ही 1 सेमी ने कापा. पुढील पाच दिवस दोन्ही कांद्यांच्या मुळांची लांबी दररोज मोजून पुढीलप्रमाणे तक्त्यात नोंदी केल्या आहेत त्यावरून प्रश्नांची उत्तरे द्या.