जैवतंत्रज्ञानाची ओळख

कृषी पर्यटन

views

05:11
पुरेशी जमीन उपलब्ध असल्यास कृषी पर्यटन केंद्र हा नव्याने उदयास आलेला उद्योग आहे. या व्यवसायासाठी ऊतीसंवर्धनाची मदत घेतली जाते. त्या माध्यमातून फळझाडे, शोभेची झाडे, भाज्या, औषधी वनस्पती यांची रोपनिर्मिती केली जाते. यातील काही प्रकारची झाडे वाढवून कृषी पर्यटन केंद्र तयार केले जाते. कृषी पर्यटन केंद्रात भाजी, फुले, फळे यांचेही उत्पादन घेता येते. कृषी पर्यटन केंद्रात पुढील रोपे किंवा वनस्पतीची वाढ केली जाते. 1) आंबा, चिकू, पेरू, नारळ, सीताफळ व काही प्रादेशिक फळझाडांचा समावेश पर्यटन केंद्रात करता येतो. 2) तसेच सावली देणारे नयनरम्य असे देशी व विदेशी वृक्ष असतात. 3) शोभेची झाडे, फुलझाडे असतात. 4) ज्या फुलांवर फुलपाखरे येतात अशा फुलांची बाग तयार करता येते. 5) औषधी वनस्पतींची बाग तयार करता येते. 6) रासायनिक खते, कीडनाशक यांचा वापर न करता सेंद्रिय भाज्या, फळे यांचे उत्पादनही घेता येते. अशा ठिकाणी पर्यटक कृषी पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे याठिकाणी रोपे, भाज्या, फुले, फळे यांची विक्री करून योग्य तो मोबदलाही मिळवता येतो.