जैवतंत्रज्ञानाची ओळख

जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनात झालेले बदल

views

06:03
आज जैवतंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये आमूलाग्र असे बदल झालेले आपण पाहत आहोत. ते पुढीलप्रमाणे आहेत: 1) पिकांच्या डी.एन.ए मध्ये बदल घडवून जनुकीय सुधारित वाण तयार केले जातात. असे तयार झालेले वाण हे निसर्गात आढळून येत नाहीत. याचाच अर्थ असा की, नवीन प्रजातींमध्ये उपयुक्त असे गुणधर्म संकरित केले जातात. 2) वातावरणातील ताण सहन करण्याची क्षमता, बदलणारे तापमान, ओले व सुके दुष्काळ, बदलते हवामान हे सर्व ताण काही नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाहीत. मात्र GM सुधारित प्रजाती म्हणजेच जनुकीय सुधारित वाण हे यांपैकी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत वाढतात. 3) उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता या प्रजातीमध्ये असते. त्यामुळे जंतुनाशके, कीटकनाशके, अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो. 4) GM म्हणजेच जनुकीय सुधारित बियाणांमुळे जास्त प्रमाणात पिकांचे नुकसान होत नाही व त्यांच्या पोषणमूल्यात वाढ होण्यास मदत होते. अशाप्रकारे GM बियाणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या बियाणांमुळे उत्पादन वाढते, शिवाय लागवडीचा खर्चही कमी होतो. उच्च उत्पादन पीक जाती केळी, मका, भात, बटाटा, सोयाबीन, टोमॅटो, कापूस, सफरचंद, वांगी, पपई, गुलाब, बीट, तंबाखू, गहू इत्यादी पिकांच्या GM प्रजाती उपलब्ध आहेत. यांपैकी काही पिकांमध्ये कीडरोधक जनुकांचे रोपण केले आहे. उदा, मका: MON 810, MON 863, बटाटा: अॅम्फ्लोरा, भात: गोल्डन राईस, सोयाबीन: विस्टिव्ह गोल्ड, टोमॅटो: वैशाली, कापूस: बी.टी. कॉटन. अशाप्रकारे ऊतीसंवर्धनाच्या माध्यमातून हरित क्रांतीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत मिळते. शिवाय भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील अन्नाची गरज पूर्ण होण्यास मदत मिळते आहे.