जैवतंत्रज्ञानाची ओळख

स्थायी ऊती

views

03:46
स्थायी म्हणजेच ‘कायमस्वरूपी’ असणाऱ्या ऊतींना स्थायी ऊती म्हणतात. विभाजी ऊतींच्या विभाजनाने तयार झालेल्या नवीन पेशी त्यांच्या पूर्ण वाढीनंतर काही ठरावीक ठिकाणीच कार्य करतात. त्यावेळी त्यांची विभाजन करण्याची क्षमता संपुष्टात येते. अशा प्रकारे कायमस्वरूपी आकार, आकृती व कार्य धारण करणाऱ्या प्रक्रियेस विभेदन असे म्हणतात. अशा विभेदन झालेल्या पेशींपासूनच स्थायी ऊती तयार होत असतात. स्थायी ऊती या सरल ऊती आणि जटिल ऊती अशा दोन प्रकारच्या असतात. त्यांविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. सरल स्थायी ऊती: एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या स्थायी ऊतींना सरल स्थायी ऊती म्हणतात. सरल स्थायी ऊतींचे कार्यानुसार खालीलप्रमाणे प्रकार पडतात.