जैवतंत्रज्ञानाची ओळख

कुक्कुटपालन

views

03:09
कुक्कुटपालन हा शब्द तुम्ही नेहमी ऐकतच असाल. शेतीला योग्य पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन या व्यवसायाकडे पाहिले जाते. यामध्ये ‘अंडी व मांस देणाऱ्या कोंबड्यांचे पालन पोषण पैदास केली जाते, म्हणून यास कुक्कुटपालन असे म्हणतात. आज भारत देशामध्ये विविध देशी व परदेशी जातींच्या कोंबड्यांचे पालन केले जाते. तसेच ‘असील’ सारख्या भारतीय व लेगहॉर्न सारख्या परदेशी कोंबड्यांच्या संकरातून नवीन जाती विकसित केल्या जात आहेत. यामागील हेतू चांगल्या गुणवत्तेची पिल्ले मोठ्या संख्येत मिळावी, जास्त तापमान सहन करण्याची त्यांची क्षमता असावी, तसेच शेतातील उप-उत्पादनांचा वापर त्यांच्या अन्नासाठी व्हावा हा आहे. अंडी व मांस या दोन्हींसाठी ऱ्होड आयलंड रेड, न्यू हॅम्पशायर, प्लायमाऊथ रॉक, ब्लॅक रॉक ह्या कोंबड्या पाळल्या जातात.