जैवतंत्रज्ञानाची ओळख

संयोजी ऊती

views

04:26
संयोजन म्हणजे जोडणे. संयोजी ऊती हा मानवी शरीरातील सर्वात प्रचलित आणि व्यापकपणे वितरित ऊती प्रकार आहे. शरीराचे वेगवेगळे भाग एकमेकांना ज्या उतींद्वारे जोडले जातात त्या ऊती म्हणजेच संयोजी ऊती होत. या ऊतींतील पेशींची रचना सैलसर असते. म्हणजे या ऊतींतील पेशींमध्ये थोडी मोकळी जागा असते. मोकळ्या जागेमध्ये या पेशींना आधार देण्यासाठी आधारक असतात. हे आधारक घनरूप, जेलीसदृश्य किंवा पाण्यासारखे द्रवरूप असतात. रक्त, लसिका, विरल ऊती, चरबीयुक्त ऊती, कास्थी, अस्थी, स्नायूरज्जू व अस्थिबंध हे संयोजी ऊतींचे प्रकार आहेत. त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ. रक्त : बंदिस्त रक्ताभिसरण संस्थेत रक्त असते. रक्तद्रवात लोहित रक्तकणिका, श्वेतरक्तकणिका व रक्तबिंबिका तसेच द्रवरूप आधारक असते. ऑक्सिजन, पोषकद्रव्ये व संप्रेरके तसेच उत्सर्जित पदार्थांचे वहन करण्याचे कार्य रक्ताचे असते. लसिका: या शरीरातील पेशींच्या सभोवताली असतात. हा रक्तकेशिकांतून पाझरणारा द्रव असतो. यात श्वेतरक्तकणिका व द्रवरूप आधारक असतात. रोगांच्या संक्रमणापासून शरीराचे संरक्षण करण्याचे कार्य लसिका करतात.