जैवतंत्रज्ञानाची ओळख

स्नायूऊती

views

04:43
आपण आपल्या हाताच्या कोपराची, पायाच्या गुडघ्याची हालचाल करतो. हाताच्या कोपराची किंवा पायाच्या गुडघ्याची जी हालचाल होते ती हालचाल स्नायूंच्या आकुंचन व शिथलीकरणामुळे होत असते. हे आकुंचन व शिथिलीकरण ज्यांच्यामुळे होते, त्या विशिष्ट प्रकारच्या संकोची प्रथिनांपासून स्नायूतंतू व स्नायुऊती बनतात. स्नायुऊती या स्नायुतंतूंच्या लांबट पेशींपासून बनलेल्या असतात. या पेशींतील संकोची प्रथिनांच्या आकुंचन व शिथलीकरणामुळे स्नायूंची हालचाल होत असते. पट्टकी स्नायू, अपट्टकी स्नायू, हृद्य स्नायू हे स्नायू ऊतींचे प्रकार आहेत. तर आता आपण स्नायू ऊतींच्या या प्रकारांविषयी माहिती घेणार आहोत.