सांख्यिकी

सोडवलेली उदाहरणे

views

04:02
सोडवलेली उदाहरणे: उदा1) सार्वजनिक वाहतूक सेवेच्या 60 बसेसनी एका दिवसात कापलेल्या अंतराची वारंवारता सारणी दिली आहे. बसेसनी एका दिवसात कापलेल्या अंतराचा मध्यक काढा. दैनंदिन कापलेले अंतर (किमी) 200-209 210-219 220-229 230-239 240-249 बसेसची संख्या 4 14 26 10 6 उकल: मुलानो, या सारणीत दिलेले वर्ग सलग नाहीत, एका वर्गाची वरची मर्यादा व पुढील वर्गाची खालील मर्यादा यांतील फरक 1 आहे. ∴ 1÷2 = 0.5 ही किंमत प्रत्येक वर्गाच्या खालच्या मर्यादेतून वजा करू आणि वरच्या वर्गमर्यादेत मिळवून वर्गसीमा ठरवू. त्यानुसार वर्ग सलग करू व नवी सारणी लिहू.