सांख्यिकी

सांख्यिक सामग्रीचे चित्ररूप सादरीकरण

views

04:33
सांख्यिक सामग्रीचे चित्ररूप सादरीकरण: सांख्यिक माहितीचा मध्य, मध्यक, बहुलक यांवरून किंवा माहितीचे विश्लेषण करून त्याचा उपयोग काही विशिष्ट निष्कर्ष मिळवण्यासाठी होतो. सांख्यिक माहिती संक्षिप्त रूपात सादर करण्याची एक पद्धत म्हणजे सारणीच्या रुपात सामग्री मांडणे हे आपल्याला माहीत आहे, परंतु सारणीच्या रूपात असल्यामुळे त्यावरून काही बाबी झटकन लक्षात येत नाहीत. सामान्य माणसांना त्या समजण्यासाठी, म्हणजेच सर्वसामान्य लोकांचे लक्ष सामग्रीतील महत्त्वाच्या बाबींकडे वेधण्यासाठी, त्या माहितीचे सादरीकरण वेगळ्या प्रकारे करता येईल का असा विचार करू. उदाहरणार्थ, अर्थसंकल्पातील बाबी, खेळातील माहिती इत्यादी.